Thursday, January 19, 2017

कोणत्याही संख्येला 5 ने स्पिडने गुणने

*कोणत्याही संख्येला 5 ने स्पिडने गुणने*
➖➖➖➖➖➖➖➖
✡कोणत्याही संख्येला 5
    ने स्पिडने गुणने🔯
पायरी- समसंख्येसाठी
🍀 दिलेल्या संख्येची निमपट करा म्हणजेच 2 ने भागा व आलेल्या उत्तरासमोर                   0 ठेवा
🍀   विषमसंख्येसाठी
दिलेल्या संख्येच्या आधीची संख्येची निमपट करा व आलेल्या उत्तरापुढे  5  ठेवा
☯☯ समसंख्येसाठी
   64×5=
64 ची निमपट=32
उत्तरापुढे  0  ठेवा
     उत्तर=  320
🍀 102×5=
102 ची निमपट= 51
उत्तरापुढे 0  ठेवा
    उत्तर= 510
☯☯ विषमसंख्येसाठी
  🍀  37 ×5 =
37 च्याआधीची संख्या= 36
  निमपट =18
पुढे  5  ठेवा  = 185
🍀  95×5=
95 च्या आधीची  संख्या=94
 निमपट  =47
पुढे   5   ठेवा  =   475

Sunday, January 15, 2017

आपल्या मोबाईल स्क्रीन चा फोटो(screenshot) 📸घेणे

आपल्या मोबाईल स्क्रीन चा फोटो(screenshot) 📸घेणे.*
आपल्या मोबाईल वरील प्रॉब्लेम,  चॅटिंग किंवा इतर आपल्या मोबाईल स्क्रीन वरील महत्वपूर्ण माहिती कि शब्दात न सांगता त्याचा फोटो घेऊन जसं आहे तसं इतरांना share करण्यासाठी , ऑनलाइन काम करत असताना एखादी माहिती , इमेज,कोड , ऍड्रेस ई. चा स्क्रीन शॉट घेऊन आपल्या कडे जतन करता येईल.
आता बऱ्याच Latest andriod मोबाईल ना स्क्रीनशॉट काढण्यासाठी inbuilt system/app उपलब्ध आहे , ते पाहण्यासाठी power button प्रेस करा, त्या मध्ये power off , rebbot, screenshot etc विविध ऑप्शन येतील त्यातील स्क्रीनशॉट ला टच करा , मोबाईल स्क्रीन चा फोटो/ स्क्रीनशॉट निघेल  आणि ज्या मोबाईल मध्ये हे inbuilt app system नसेल त्या साठी play store वर  अनेक app आहेत.
त्यातीलच वापरण्यास सोयीचं व सर्व मोबाईल वर चालणार app पाहू....

⚡ *Appचे नाव :-*
*Screenshot Easy*

⚡ *साईझ:-*
              फक्त 4.6 MB

⚡ *लिंक:-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.icecoldapps.screenshoteasy

🚫🚫 *pレz, d⊕η'† εdï†* 🚫🚫

✍..
  *संकलन व शब्दांकन :-*
         *uMЄsӇ ugӇadЄ*
                *ֆօʟaքʊʀ*
    मो.न.
       *99 22 422 445*
       *99 70 608 708*

🚫🚫 *pʅz, ɗơɲ't єɗɪt*  🚫🚫


1)वरील लिंक टच करून app डाउनलोड करून इन्स्टॉल करा.

2) app ओपन करा , आपल्याला स्क्रीनशॉट कसा घ्यायचा याची माहिती लिखित स्वरूपात पाहायला मिळेल.

3) स्क्रीनशॉट 📼दोन प्रकारे घेता येतो.
   
A) *स्क्रीनशॉट घेण्यासाठी 'power button व valume down button म्हणजे आवाज कमी करण्याचे बटन' हे दोन्ही एकाच वेळी दोन सेकंद प्रेस करा/ दाबून धरा. स्क्रीन चा फोटो निघेल, फोटो निघत असताना कॅमरा चा आवाज येईल व स्क्रीनशॉट इमेज सेव्ह देखील होईल.*

वरील पद्धतीने स्क्रीनशॉट निघत नसेल तर
B) *वरील प्रमाणेच 'power button आणि मोबाईल चे home button " दोन्ही एकाची वेळी 2 सेकंद प्रेस करा/ दाबून धरा.*
*फोटो काढल्यासारखा आवाज येईल व स्क्रीनशॉट इमेज सेव्ह होईल.*
*ते आपण मोबाईल gallery तुन पाहू शकतो.*

4) स्क्रीनशॉट app मध्ये जाऊन ⚙ सेटिंग मधून आपण हवी तशी सेटिंग करता येईल.
Theme, language, storage, file name,date and time, rotate, switch colour , image format etc ची हवी तशी सेटिंग करू शकतो.

आहे ना सोप्प....!📸

चला तर मग, *या app च्या सहाय्याने 📷स्क्रीनशॉट घेऊन "स्मार्ट मोबाईल वापरकर्ते " व्हा  व इतरांनाही सांगा .
 
  🙏🙏 *धन्यवाद* 🙏🙏

whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?

*whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?*
नमस्कार मित्रांनो
*_whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवून पाठवावी?_*
_काही मोजक्या स्टेप्स आहेत._

_१) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा._
_२) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या._
_३) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल._
_४) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल,--_
_५) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेरा 📽( चे चित्र दिसेल._
त्यावर क्लिक करा._
_६) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल._

पासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक

*पासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक*

बहुतेकवेळा अनेकजण आपल्या मोबाईलचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न विसरून जातात. यामुळे मोबाईल सुरु करण्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर शॉप किंवा मोबाईलच्या दुकानात जावं लागतं. यासाठी पैसेही खर्च करावे लागतात. पण पासवर्ड विसरला असाल तर घर बसल्यावरही फोन अनलॉक करता येतो.

1 फोनचा लॉक पॅटर्न किंवा लॉक विसरलात तर सगळ्यात आधी फोन स्विच ऑफ करा. जवळपास एक मिनीटापर्यंत हा फोन स्विच ऑफ ठेवा.

2 यानंतर फोनचं व्हॉल्यूम बटण, होम स्क्रीन बटण आणि पॉवर बटण एकत्र दाबा. ही तिन्ही बटणं एकत्र दाबल्यानंतर तुमच्या फोनवर लाईट लागेल.

3 यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाच ऑप्शन येतील.

• Reboot data

• Wipe data/ factory reset

• Install update

• Power down

• Advanced option

4 या ऑप्शनपैकी दुसरा ऑप्शन म्हणजेच Wipe data/ factory reset वर क्लिक करा.

5 यानंतर फोन रिस्टार्ट करा. तुमच्या फोनमधून पासवर्ड आणि पॅटर्न लॉक गेलेलं असेल.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधला सगळा डेटा खाली होईल. तुमच्या मोबाईलमधले फोटो, व्हिडिओ, मेसेज, कॉन्टॅक्ट्स सगळं डिलीट होईल. त्यामुळे फोन फॅक्ट्री रिसेट करताना विचार करा.

_donot below follow link_
https://drive.google.com/file/d/0ByAeWp8YuuOBVzBWaDA4b2VsR1E/view?usp=drivesdk

आपल्या ब्लॉग *marquee show प्रदर्शित करणे

आपल्या ब्लॉग *marquee show प्रदर्शित करणे*

*ब्लॉग वर विशेष मजकुराला  कसे पळवायचे.?*

याविषयी video पाहुया.

*marquee show प्रदर्शित करणे*
साठीचे खालीलप्रमाणे कोड copy करा आपणास हव्या त्याठिकाणी पेस्ट  करा.
सुस्वागतम् नावाच्या ठिकाणी आपला मजकुर टाका.व ब्लॉग वर सेन्स करून open करा.
आपल्या ब्लॉग वर दिलेल्या directions प्रमाणे वाक्ये पळतांना दिसतील.
1) वाक्ये डावीकडे पळविणे.
👇👇
*<marquee direction="left"> सुस्वागतम </marquee>*
2) वाक्ये उजवीकडे पळविणे.
👇👇
          *<marquee direction="right"> सुस्वागतम </marquee>*
3)  वाक्ये वरूनखाली पळविणे.
👇👇👇
                  *<marquee direction="down"> सुस्वागतम </marquee>*
4) वाक्ये खालुनवर पळविणे.
👇👇
                    *<marquee direction="up"> सुस्वागतम </marquee>*
🆔🆔🆔🆔🆔🆔🆔

एखादी फाईल PDF format मध्ये कशी बनवाल?


*एखादी फाईल PDF format मध्ये कशी बनवाल?*
          *Pc वर*
👉 *सर्वप्रथम आपण PDF म्हणजे काय ते समजून घेऊ.*
 PDF हा असा format आहे ज्यामध्ये आपण एखादी फाईल font मध्ये जर बनवली असेल आणि आपणास ती दुसऱ्या संगणकाला जर पहावयाची असेल तर त्या संगणकावर तुम्ही ज्या font मध्ये फाईल बनवली तो font असल्याशिवाय तुम्हला काहीच पाहता येणार नाही. त्यासाठी आपणास ती फाईल PDF मध्ये convert करून घ्यावी लागते.

याचा वापर कोठे होतो?

ज्या ठिकाणी font चा पर्याय उपलब्ध होत नाही.
पेज सेट अप करून त्याची PDF बनवल्यास जेथे प्रिंट करणार त्या ठिकाणी पेज सेट अप करण्यास वेळ वाया जात नाही.
आपणास एखादी फाईल बनवल्यानंतर त्यात त्रयस्त व्यक्तीस जर बदल करून द्यायचा नसेल तर PDF चा वापर होतो.


👉 *PDF मध्ये एखादी file कशी रुपांतरीत करावी?*


MS office 2010 या वर्जन मध्ये word/excel/powerpoint ची फाईल PDF मध्ये सेव्ह करायची असेल तर खालील स्टेप्स अवलंबावा.
File  >  Save As  > Give file name > Select file Type as : PDF
याद्वारे तुमची फाईल PDF मध्ये convert होईल.


जर एखाद्या वेब पेज चे किंवा जेथे save as type PDF उपलब्ध नसेल तेथे आपणास softwear वापरावे लागते.

👉 *softwear च्या साह्याने कशी PDF बनवावी?*

प्रथम तुमच्या device वर खालील लिंक वरून softwear डाऊनलोड करावे.
http://foxtab-pdf-creator.en.lo4d.com/
सर्व प्रथम हे softwear install करून घ्यावे.
हे softwear install झाल्यावर त्याचे अस्तित्व प्रिंटर या option मध्ये दिसून येईल.
ज्याचे PDF मध्ये conversion करायचे आहे त्या फाईल ला प्रिंट पर्याय दाबा.
तुम्हाला प्रिंटर निवडण्यास संधी दिली जाईल.
त्यामध्ये प्रिंटर टाईप "PDF creator" हा पर्याय निवडावा.
फाईल ला नाव द्या आणि प्रिंट पर्याय वर क्लिक करा.
तुमची फाईल PDF मध्ये रुपांतरीत होईल.
💝♏🅰🅿♏🅰🅿♏🅰🅿💝

*मित्रांनो Wps office मधून pdf file बनविण्यासाठी दोन पर्याय आहेत.*

          *मोबाईल मध्ये*

👉 *1) रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे व*
👉 *2) WPS Office मध्ये मेसेज टाईप करून pdf file बनविणे.*
          *आज आपण wps office मध्ये pdf file कशी तयार करायची याची माहिती घेऊया.*
 ☺ *रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे*
     *यामध्ये Hike, Facebook and What's app वरील मेसेजची pdf file बनवणे याचा समावेश आहे.*
☺      *चला तर मग मी सांगतो तशी कृती करा.*
👉  *सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या.*

👉  *आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा.*

👉  *आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा.*

👉  *आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPY केलेला मेसेज दिसेल.*

👉  *आता त्या खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.)*

👉  *त्यानंतर आपल्याला SD CARD मधील फोल्डर आणि खाली फाईल चे नाव दिसतात. पाहिजे ते फोल्डर निवडा व फाईलचे नाव टाका आणि खालील Exports to pdf ला टच करा. आपली फाईल 100% pdf मध्ये CONVERT झाली आहे.*

 ☺  *Ready made file  PDF मध्ये Convert होताना राहणारे दोष*
         
👉  *i) ही तुमची फाईल साध्या पद्धतीने pdf मध्ये convert झाली आहे. पण ही pdf मला पसंत नाही. कारण आपली ही फाईल  Ready-made  फाईल होती.*
👉  *ii) ती जशीच्या तशी pdf करताना File Font 11 राहतो. म्हणजे एकदम लहान. शिवाय आपल्याला पाहिजे तसा परिच्छेद मिळालेला नसतो.*
👉  *iii) अक्षरे bold नसतात. शिवाय अक्षरांना लुक नसतो. दोन ओळींच्या मध्ये जास्त अंतर राहते. म्हणजे जास्त जागा आणि कमी शब्द असे होते आणि प्रिंट पण हवी तशी मिळत नाही.*
  *iv) पेज साईज पण Letter असते ती A4 नसते.*
           
  👉    *मग यावर काही उपाय आहे की नाही?  तर आहे ना..... आपण Ready made फाईल copy करून paste केल्यावर direct pdf मध्ये Convert न करता अगोदर ती edit (दुरूस्त) करून घ्यायची आणि मग pdf मध्ये convert करायची. म्हणजे मग आपल्याला हवी तशी फाईल तयार करता येते.*
 😊     *मग यासाठी कृती आहे ती खालीलप्रमाणे*

👉  *1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या.*

👉  *2) आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा.*

👉  *3) आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा.*

👉  *4) आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPY केलेला मेसेज दिसेल.*
          *आता ही फाईल आपल्याला edit (दुरूस्त) करायची आहे.*

👉  *5) यासाठी खाली दिलेल्या Tools मधील View button ला टच करून page setup ला टच करा. यामध्ये Letter ला टच करून A4 साईज निवडा.त्यानंतर Orientation मधून Portrait म्हणजे उभे पेज किंवा Landscape म्हणजे आडवे पेज यापैकी तुम्हाला ते निवडा. Page margin मधून सर्व बाजूला छोटे बाण दिसतात. तुम्ही त्या बाणांनी हवी तशी मार्जिन करून घ्या. कोपर्‍यात OK button दिसते त्याला टच केले की आपले Page setup पूर्ण होते.*

👉  *6) View मध्येच page background ला टच केले की आपल्याला पेजचा background बदलण्यासाठी पाहिजे ते कलर उपलब्ध आहेत. योग्य तो कलर निवडून घ्या. Background कलर घेतलाच पाहिजे असे नाही. नाही घेतला तरी चालेल.*

👉  *7) आता आपल्याला font type बदलायचा आहे. त्यासाठी समोर दिसणार्‍या मेसेज मधील अगदी सुरुवातीच्या शब्दाजवळ बोटाने थोडा वेळ दाबून धरा. काही options दिसतील. यामधील Select all ला टच करा. आता पुन्हा खालील Tools ला टच करून त्यामधील Font ला टच करा. लगेच आपल्याला size 11 दिसेल. त्याला टच केले की आपल्याला हवी ती Font size निवडून घ्या. जर अक्षरे गडद रंगाची हवे असेल तर खालील B ला टच करा. तसेच तुम्हाला अक्षरांना खालील हवे ते effects निवडता येतील. ते दिले की कोपर्‍यात Done दिसेल त्याला टच करा. आता तुमची अक्षरे बदललेली दिसतील.*

👉  *8) मित्रांनो Tools मध्ये insert म्हणून एक टॅब आहे. यामधून तुम्हाला हवे ते चित्र घेण्यासाठी pictures option आहे. . तसेच आडवे उभे रकाने हवे असतील तर त्यासाठी Table पण आहे. तसेच header footer पण आहे.*

👉  *9) मेसेजमध्ये हवी तेवढी दुरूस्ती केल्यानंतर आपल्याला आता या मेसेज ची pdf file तयार करायची आहे.त्यासाठी खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.)*

💞     *विशेष सूचना - ज्या वेळी आपण done किंवा OK कराल त्यावेळी फाईल पूर्ण होत असते. अशा वेळी Tools मधील नवीन टॅब वापरायची गरज असेल तर पेज च्या कोपर्‍यात edit शब्दाला टच करा. लगेच तुम्हाला की बोर्ड उपलब्ध होईल.*
            *आहे की नाही सोप्पं...... आता तुम्ही मोबाईल PC ला connect करून तुम्ही Save केलेली फाईल PC, Laptop वर घेऊ शकता. किंवा मेमरी कार्ड काढून PC ला कनेक्ट करू शकता.*
☺          *फायदे*
        *मित्रांनो हल्ली Hike किंवा whatsapp वर जनरल नॉलेज चे बरेच प्रश्न आणि उत्तर येतात. English word येतात. समानार्थी, विरूद्ध अर्थाचे शब्द येतात. अशी आणि यापेक्षाही उपयुक्त माहिती दररोज येत असते. या माहितीची pdf file तयार करून त्याच्या प्रिंट काढून आपल्या वर्गातील मुलांना देता येईल. याशिवाय आपल्याकडे प्रचंड ज्ञानाचे भांडार होईल.*

ब्लॉग निर्मिती video size कमी करने


*video size कमी करण्यासाठी Handbrake software चा वापर*
📢📢📢📢📢📢📢📢📢
मित्रांनो आपण online training मध्ये सहभागी झाल्या बद्दल धन्यवाद
आज 7 वा दिवस.
 *ब्लॉग निर्मिती 1ते 6भाग आपण पुर्ण केले.*  आपण विविध video निर्मिती करतो.ते videos इतरांना पाठवायचे व ज्ञानाची देवाण घेवाण करायची अशी आपली इच्छा असते मात्र
 Whats वर video पाठवायला 16 mb sizeची मर्यादा असते त्यामुळे आपण चांगले चांगले videos इतरांना शेअर करू शकत नाही.
त्यासाठी आज आपण.
Whats appवर आपले video post करण्यासाठी त्याची size कमी करण्यासाठीचा videoपाहून Handbrake   software ची माहिती शिकणार आहोत.

*video size कशी कमी करावी*

याविषयी video पाहुया.

गुगल मराठी युनिकोड फॉन्ट कसा इन्स्टॉल करायचा

गुगल मराठी युनिकोड फॉन्ट कसा इन्स्टॉल करायचा

👉🏻सर्वप्रथम www.google.com हे सर्च इंजिन ओपन करू.
👉🏻त्यात google Marathi input असे सर्च करायचे आहे.
👉🏻Google Search button click केले असता आपल्याला search result मिळेल.
त्यातील https://www.google.com/inputtools/windows/
ही लिंक आपण क्लिक करून ओपन करू.
👉🏻या लिंक वर क्लिक केले की आपल्याला Google Input Tools on Windows असे वेब पेज ओपन झालेले दिसेल.
👉🏻यात अनेक भाषा आलेल्या दिसतील त्यातील मराठी भाषेसमोरील चौकोनात क्लिक करावी.
👉🏻त्यानंतर I agree to the Google Terms of Service and Privacy Policy. च्या समोरील check box मध्ये क्लिक करावी.
👉🏻शेवटी download बटन क्लिक करावे.

👉🏻त्यानंतर आपल्याला एक file save करण्यासाठी विचारणारी विंडो येईल.
त्यात save बटन क्लिक करावे.
👉🏻save क्लिक केले की ती file download होण्यास सुरुवात होईल.

👉🏻आपण Mozilla Firefox browser वापरत असाल तर
ही file कोठे downlod झाली हे पाहण्या करिता browser च्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला असलेल्या down arrow वर क्लिक करावी.
यानंतर एक लिस्ट येईल त्यात InputToolsSetup या नावाने एक फाईल आलेली दिसेल त्यावर क्लिक केले असता Installation सुरु होईल.
👉🏻त्यानंतर हा setup आपल्याला Do you want to run this file?
असा मेसेज देईल या विंडो मधील Run बटन क्लिक करायचे आहे.
RUN वर क्लिक केले असता installing सुरु होईल.

👉🏻Installing पूर्ण झाले की Installation Complete असा मेसेज पहावयास मिळेल.
👉🏻Installation झाल्यावर स्क्रीन च्या उजव्या कोपऱ्यात task bar (desktop च्या सर्वात खालच्या पट्टीवर) वर EN दिसेल यालाच आपण Language Bar असे देखील म्हणतो.
👉🏻यावर क्लिक केली असता. आपण English आणि मराठी भाषा बदलू शकतो.

👉🏻यासाठी Shift + Alt key वापरता येते. Shift बटन दाबून ठेवावे व दुसऱ्या बोटाने Alt बटन क्लिक करावे. म्हणजे भाषा बदलेल व परत असेच केले असता पूर्वीची भाषा येईल.
👉🏻अशा प्रकारे आपण दोन्ही भाषेत typing करू शकतो.
____________________________
              

LOGO कसे तयार करावे

LOGO कसे तयार करावे *
   मित्रांनो नमस्कार,

LOGO बनवणे अगदी सोपे आहे.....

🎯 प्रथम Google play store वरून Picsa Art हे app घ्या.

🎯 picsa art  open करा

🎯Draw हे option निवडा.

🎯 Blank हे option निवडा

🎯Canvas Size निवडा

🎯🔺⚪ या option मधून ⚪(वर्तुळ)  घ्या
Size, opacity निवडा.
Stroke निवडा.

🎯 drag करुन मोठे वर्तुळ काढा. नंतर त्यात अजून एक छोटे वर्तुळ काढा.

🎯वरील बाजूच्या या ✅ वर touch  करून ok करा.

🎯 A-Text निवडा.
Matter type करा. तुम्हाला जो हवा असेल.
उदा - जि. प.प्राथमिक शाळा.......
नंतर  color select करा.

🎯 खालील बाजुला असलेल्या 🈸 अशा प्रकारच्या चिन्हावर touch करा.
Orientation
Opacity
Wrap या option पैकी , Wrap select करा.
Wrap  हवे तसे set करा.

🎯 Clip art मधुन पाहिजे ते picture तुमच्या logo नुसार निवडा.

🎯 तुमचा LOGO तयार.

🎀🎀🎀🎀

     धन्यवाद.

what's app laptop ला जोडणे

what's app laptop ला जोडणे*

📢📢📢📢📢📢📢📢📢
मित्रांनो आपण online training मध्ये सहभागी झाल्या बद्दल धन्यवाद
आज 8 वा दिवस.
 *ब्लॉग निर्मिती 1ते 6भाग आपण पुर्ण केले.स्वतःचा ब्लॉग तयार केला असेलच*
आज नवीन तंत्रज्ञान ओळख.
*मोबाईल स्क्रीन वर मोठे मोठे मेसेज टाईप करणे शक्य होत नाही का?*


*स्क्रीन लहान असल्याने मेसेज वाचता येत नाहीत का?*


यावर उपाय म्हणून

 *आज आपणWhats app laptops ला जोडणे विषयीची माहिती शिकणार आहोत.*

*what's app laptop ला जोडणे*

याविषयी video पाहुया.

🎦🎦🎦🎦🎦🎦🎦
काल पर्यंत आपण ब्लॉग निर्मितीचे 6 भाग पाहिले त्यानुसार आपला एक उत्कृष्ट तयार झाला असेलच
ज्यांच्या कडे भाग 1 ते 6 नसतील त्यांनी माझ्या ब्लॉग वरून डाउनलोड करून घ्यावे
तसेच Handbreak चा video मिस झाला असेल तर तोही तेथे उपलब्ध आहे.
chavanprakash001.blogspot.com


🆔🆔🆔🆔🆔🆔🆔

Q R Code तयार करणेे

*Q R Code तयार करणेे*

*आज Q R Code ही काळाची गरज  बनली आहे*

*आपण कोणतीही वस्तू खरेदी करा त्या वस्तूवर बारीक रेषांचा किंवा ठिफक्यांचा समुह छापलेला असतो.त्याला Q R Code म्हणतात.त्यावर आपण मोबाईल फोन मधील Q R Code  स्कॅनर app ने स्कॅन केले की त्या प्रोडक्टची माहिती open होते.*



*त्या पद्धतीने आपण आपल्या ब्लॉग चा पाठ्यपुस्तकातील एखाद्या घटकाचा QR code तयार करून मित्रांना पालकांना देवू शकतो.*



चला.
 *आज आपण Q R Code तयार करण्या विषयीची माहिती शिकणार आहोत.*

*Q R Code तयार करूया*

याविषयी video पाहुया.

लॅमिनेशन घरच्या घरी

प्रिंट काढा व लॅमिनेशन करा.

लॅमिनेशन घरच्या घरी स्वतः करा तेही लॅमिनेशन मशीन शिवाय.
कृती:-
1) A4 साईझ मध्ये प्रिंट/झेरॉक्स काढा.(दोन्ही बाजूस/पाठपोठ प्रिंट काढू शकता.)

2) लॅमिनेशन पेपर मध्ये व्यवस्थित घालून घ्या.

3) वर्तमान पत्रात ते लॅमिनेशन पेपर घाला व त्यावर ऍडजस्ट ने इस्त्री फिरवा. वर्तमान पत्र लॅमिनेशन पेपर च्या खालून व वरून असलं पाहिजे आणि इस्त्री प्रमाणात गरम करा.

4) दोन मिनटात लॅमिनेशन तयार.

5) पायलट पेन किंवा इतर जेल पेन ने लॅमिनेशन वर सहज लिहलं जात व ओल्या कापडाने पुसलं पण जात.
या पद्धतीने 1 झेरॉक्स 2 + एक लॅमिनेशन पेपर 5 + एक पेन 10= म्हणजे एकूण 20 रुपये पर्यंत खर्च येईल.

*अशा प्रकारे कधीही,कुठेही सराव घेता येईल शिवाय खर्च हि मर्यादित.*

चला तर मग डाउनलोड करा व ज्ञानरचवाद - वापर/सराव घ्या.
*अशा प्रकारे तुम्ही हि तुमच्या कल्पकतेने अधिक मटेरियल तयार करू शकता.मी नमुना दाखल दिले आहे.*

व्हिडीओ मेकिंग

आपल्या जवळ स्मार्ट फोन असेल तर आपला वर्ग स्मार्ट .मोबाईल द्वारे vdo मेकिंग .आपल्या वर्गासाठी आपणच .vdo तयार करुया .आणि आपल्या वर्गाची गुणवत्ता वाढवूया .💐🌺💐
▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
▶ आपल्या कडे viva vid eo app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या ▶Viva video ओपन करा
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
▶ सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का
▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
 ▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का
▶ Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूण आह.आहे का
▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा
▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल
▶ नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा kruti करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶[ Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .
▶ तो vdo draft मधे सेव करा
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .शेअर करु नका .
▶ आता थांबु या vdo तयार झाला झाला.
*All d best* 👍करा तयार video....

_Best Photo Editing apps

_Best Photo Editing apps_

i) *PhotoDirector - Photo Editor:*

PhotoDirector हे अतिशय साधे आणि वापरण्यास सोपे फोटो इडिटर आहे. यात मोबाइलमधील इमेजेसला जलद गतीने आणि सोप्या पध्दतीने कोणताही इफेक्ट देता येतो. यात फोटो इडिटींग साठी अतिशय पावरफूल टूल आहेत जे फोटो मधील नको असलेले ऑब्जेक्ट किंवा व्यक्ती काढून टाकतात, सॅचूरेशन आणि टोन अॅडजेस्ट करतात, एका क्लिक ने फोटोसाठी अनेक प्रिसेट निवडता येतात.


ii) *Adobe Lightroom:*

एडॉब लाइटरूम या मोबाइल अॅप मध्ये तुम्ही कोणताही फोटो इडिट करू शकता आणि त्यांना इतर डिव्हाइस मध्ये अॅक्सेस करू शकता. यात 40 पेक्षा प्रिसेट आहेत जे एका क्लिकने इमजेसला अॅप्लाय करता येतात. तसेच यात कलर इफेक्ट, क्ल्ॅारिटी अॅडजस्ट, नॉइस रिडक्शन सारखे अनेक फिचर्स आहेत.


iii) *VSCO Cam:*

VSCO कॅम फोटो मध्ये बदल करण्यासाठी प्रिसेटची विस्तृत मालिका पुरवतो. याचा वापर करून कोणिही कोणत्याही फोटोला जबरदस्त आकर्षक बनवू शकतो.



_Best Selfie Apps:_

i) *YouCam Perfect - Selfie Cam:*

YouCam Perfect मध्ये तुम्ही कोणत्याही सेल्फीचे परिपूर्ण फोटो मध्ये रूपांतर करू शकता. YouCam Perfect हा तुमच्या चेह-याची नॅचरल ब्युटी वाढवतो. तसेच या अॅप मध्ये रिटचींग इफेक्ट, स्कीन टोन अॅडसमेंट, फिल्टर्स, चेह-यावरील सुरकत्या सहजपणे काढून टाकण्याची क्षमता यासारखे अनेक फिचर्स आहेत.

ii) *Candy Camera for Selfie:*

Candy Camera हे सुध्दा एक बेस्ट सेल्फी कॅमरा अॅप आहे. यात अनेक फिल्टर्स आहेत जे तुमच्या सेल्फीला आश्चर्यकारक इफेक्ट देतात. यात जिओ-टॅगींग, म्युट मोड, अनेक फिल्टर्स यासारखे अनेक फिचर्स आहेत.


iii) *Retrica:*

Retrica हे कोणत्याही फोटोला संस्मरणीय अनुभव परिवर्तन करतो. Retrica मधील लाइव्ह फिल्टर्स मध्ये फोटो घेण्याआधि तो कसा दिसेल हे बघता येते. या अॅपचा उपयोग मजेशिर सेल्फी, मौल्यवान कुटूंबासाबतचे क्षण, रोमांचक प्रवासाचे फोटो घेण्यासाठी करा.

_upadates may vary_
*Dont follow below link👇🏻*

https://drive.google.com/file/d/0ByAeWp8YuuOBVzBWaDA4b2VsR1E/view?usp=drivesdk

संगणकाचा इतिहास

*संगणकाचा इतिहास*

हार्डवेयर, सॉफ्टवेर म्हणजे काय?
Ⓜ *हार्डवेयर* (Hardware) म्हणजे ईलेक्टोनिक्स भागानी जोडून केलेले संगणक होय . उदा . मॉनिटर , की-बोर्ड , हार्ड डिस्क , मदर बोर्ड , कैबिनेट , माउस , सी डी रोम , आदि.

Ⓜ *सॉफ्टवेर* (Software) म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या प्रकारच्या सॉफ्टवेर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेर . ऑपरेटिंग सिस्टम्स (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे . संगणकाचे हार्डवेयर व सॉफ्टवेर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही . संगणक आणि त्यावर काम करणार्या व्यक्ति मधील सुसवांद सॉफ्टवेर मुळेंच होतो .


Ⓜहार्डवेयर (Hardware)
की-बोर्ड (Keyboard):-

की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो . की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर सारखा असतो . जशी की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात . की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात .

Ⓜकी बोर्ड चे साधारण खालील चार भाग पडतात .
१) फक्शनल की पेड़ २) अल्फा न्युमरिकल की पेड़ ३) न्युमरिकल की पेड़ ४) कर्सर की पेड़

१) फक्शनल की पेड़ :- या मध्ये F1 ते F2 अशा फक्शनल कीज असतात . ह्या सर्व विशिष्ट कामा साठीच वापरतात .
२) अल्फा न्युमरिकल की पेड़ :- या मध्ये A ते Z ही इंग्लिश मुळक्षरे असतात . एकूण २६ आणि ० ते ९ असे अंक असतात .
३) न्युमरिकल की पेड़ :- यात ० ते ९ असे अंक असतात आणि काही विशिष्ठ कीज काही विशिष्ठ कामा साठीच वापरतात .
४) कर्सर की पेड़ :- लेफ्ट, राइट, डाउन , अप ह्या जागेवर जायचे असल्यास ह्या कीज चा उपयोग केला जातो .

की बोर्ड वर कमीत कमी ८३ तर १२७ बटन असतात . सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज असतात . ज्या की बोर्ड वर ११० कीज पेक्षा जास्त कीज असतात त्याला मल्टीमीडिया की-बोर्ड म्हणतात .

की-बोर्ड CPU च्या मागील भागाला जोडले असते . की-बोर्ड नोर्मल, पीस/२ , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत .
विन्डोज़ XP मध्ये स्टार्ट मेनू वर क्लिक करून Run या आप्शन वर OSK टाइप करून ENTER बटन दाबल्या नतर एका विंडोवर एक कीबोर्ड येइल यावर माउस ने क्लिक केल्यास तेच के टाइप होतील ज्यावर आपण क्लिक करू .असा कीबोर्ड ज्या वेळेस आपला कीबोर्ड चालत नसेल काही कही कीज काम करत नसतील तेव्हा ऑन स्क्रीन कीबोर्ड कामाला येतो.

            

*कॉम्प्युटरचा स्क्रीन शॉट कसा घ्याल*?

🎉🎉  *स्क्रीन शॉट*🎉

  *कॉम्प्युटरचा स्क्रीन शॉट कसा घ्याल*? .....

👇👇

 🎀  स्क्रीन शॉट घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत.  🎀

 त्यासाठी काही कीबोर्ड शॉर्टकटस् वापरले जातात. तुमच्या संपूर्ण कॉम्प्युटर स्क्रीनचा स्क्रीन शॉट घ्यायचा असल्यास की बोर्डवरील ‘प्रिंट स्क्रीन’ ही की दाबावी. त्यानंतर minimize karun‘पेंट’ APP ओपन करून त्यामध्ये ‘पेस्ट’ करावे. म्हणजे पूर्ण स्क्रीन इमेज पेंटमध्ये पेस्ट होईल. त्यानंतर (SAVE AS JPG) त्याला ईमेज म्हणून ‘सेव्ह’ करावं.

तुम्हाला फक्त स्क्रीनवरील अँक्टिव्ह विंडो किंवा डायलॉग बॉक्स कॉपी करायचा असल्यास ‘अल्टर प्लस प्रिंट स्क्रीन‘ दाबून पेंटमध्ये पेस्ट करावं. स्क्रीन शॉट पेस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड, गुगल डॉक्स, पेंट किंवा फोटो शॉप यापैकी काहीही वापरू शकता.

*स्क्रीन शॉट अँप्स*...........

👏👏👏👏

की बोर्ड शॉर्टकटऐवजी तुम्ही काही अँप्ससुद्धा कॉम्प्युटर स्क्रीन शॉट घेण्यासाठी वापरू शकता.

👇👇👇👇👇

स्निपिंग टूल्स, जिंग, स्नॅगइट किंवा स्कीच.

त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्यासाठी जिंग, अँक्टिव्ह प्रझेंटर (विंडोज) वापरू शकता.

📱📲📱📲📱📲📱📲

*अँण्ड्रॉईड  चा स्क्रीन शॉट*.......

👇👇

अँण्ड्रॉईड डिव्हाईसेसचा स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्हाला *व्हॉल्युम डाऊन*आणि *पॉवर* हे *दोन्ही बटण*एकाच वेळी दाबावे लागतील. यावेळी फोटो काढल्यासारखा क्लिक असा आवाज होतो आणि तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनचा फोटो घेतला जातो.

स्क्रीनशॉट घेतला की तो  फोटो गॅलरीमध्ये किंवा फोटो अँपमध्ये सेव्ह होतो.

जर तुमच्या स्मार्ट फोनमध्ये लेटेस्ट अँण्ड्रॉईड ओएस असेल तर त्यामध्ये स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्ही फक्त पॉवर बटण एक-दोन सेकंदांसाठी दाबून ठेवल्यास एक नवीन मेनू स्क्रीनवर येतो आणि त्यामध्ये स्क्रीन शॉट हे ऑप्शन सिलेक्ट केलं जातं.

    👏👏👏👏👏👏

Saturday, January 14, 2017

Important apps

अॅप ओळख

या भागात काही खास अॅप्लिकेशन्स बद्दल माहिती दिली आहे जे एरवी आपल्याला ठाऊक नसतात मात्र यांची गरज कोणत्याही ठराविक वेळी नक्की पडू शकते. यातील काही Apps तर प्रत्येकाने नक्की वापरायलाच पाहिजेत. खालील सर्व अॅप्स मोफत असून यांना पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत.

Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन

 WPS Office : मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा

 ColorNote : नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा

Keep : गूगलचं नोंदीसाठी अॅप

Pocket : इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !

Google Photos : फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त

 Pixlr : फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह

SnapSeed : फोटोना द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा !

PhotoFunia : फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या

PicsArt : फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह

Prisma : फोटोला द्या खर्‍याखुर्‍या चित्रासारखा इफेक्ट

Sketchbook : अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक उपयोगी टूल्ससह ..

Camera 360 : कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस

,Hyperlapse : टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप

Open Camera : साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन

SmartTools : फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार !

 SensorBox : तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा

Fing फिंग : तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने
.
Parallel Space : एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ! ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर!

VLC : पीसीवरील विडिओ प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा

MX Player : स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटलसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा

Saavn / Gaana / Hungama: गाणी ऐका मोफत ऑनलाइन

Hotstar / Voot / Sony LIV : लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध!

trackID, Shazam: वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणारं अॅप

FlightRadar : तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये !

ShareIt, Xender : फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय !

Google Fit : दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक करा
⚪ *चला सिनेमा बनवुया* ⚪



स्मार्टफोनवरील कॅमेऱ्याच्या वाढत्या क्षमतेमुळे प्रत्येक घडामोडीचे चित्रीकरण करण्याकडे कल वाढत चालला आहे. अगदी लग्नसोहळय़ातील ‘कॅण्डीड’ क्षणांपासून घरातल्या घरात झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीपर्यंतच्या घटनांचे या कॅमेऱ्यानिशी ‘व्हिडीओ रेकॉर्डिग’ करण्यात येते. हॅण्डीकॅम किंवा डिजिटल कॅमेऱ्यांनिशी स्वत:च चित्रीकरण करणारेही अनेक आहेत. पण केवळ ‘व्हिडीओ रेकॉर्ड’ करून तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करता येत नाही. त्या आठवणी अधिक खुलवण्यासाठी ‘व्हिडीओ एडिटिंग’ करावेच लागते. सर्वसामान्य वापरकर्ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने ‘व्हिडीओ एडिटिंग’ करतात किंवा बाजारात कोणत्याही फोटोग्राफरकडे जाऊन व्हिडीओ एडिटिंग केले जाते. मात्र, पहिल्या पद्धतीत व्हिडीओचे संपादन चुकण्याची भीती असते तर दुसऱ्यात पैसे मोजावे लागतात. अशा वेळी संगणकावर उपलब्ध असलेले मोफत पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर एक चांगला पर्याय ठरू शकतात. अशाच काही महत्त्वाच्या ‘व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर’विषयी..

*विंडोज मूव्ही मेकर*

कोणत्याही संगणकासोबत मोफत इन्स्टॉल होऊनच उपलब्ध असलेला ‘विंडोज मुव्ही मेकर’ हे अतिशय उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन आहे. संगणकावरील व्हिडीओ क्लिप्स केवळ ‘क्लिक’ आणि ‘ड्रॅग’ करून एडिटिंग करता येते. एका वेळी अनेक व्हिडीओ ‘क्लिक’ आणि ‘ड्रॅग’ केल्यानंतर ते निवडलेल्या क्रमाने दर्शवले जातात. त्यानंतर या व्हिडीओला ‘साउंडट्रॅक’ जोडणे, कॅप्शन नोंदवणे, व्हिडीओची श्रेयनामावली तयार करणे अशा गोष्टी करता येतात. याशिवाय व्हिडीओ ‘क्रॉप’ करणे, त्यातील रंगसदृशता कमी-अधिक करणे अशा नेहमीच्या सुविधाही विंडोज मूव्ही मेकरमध्ये उपलब्ध आहेत. हे व्हिडीओ ‘सेव्ह’ करून थेट ‘यूटय़ूब’वर अपलोडही करता येतात.

*केट्स व्हिडीओ टूलकिट*

रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओचे ‘एडिटिंग’ करणे अतिशय कौशल्याचे काम असते. मात्र, व्हिडीओची लांबी कमी करणे, ठरावीक दृश्य कापणे, त्यातील रंगात कमी-अधिक करणे अशा गोष्टी आपल्याला सहज शक्य असतात. ‘केट्स व्हिडीओ टूलकिट’मध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तुम्ही एका व्हिडीओचे दोन व्हिडीओ करू शकता किंवा दोन व्हिडीओ एकमेकांना जोडूही शकता. याशिवाय साउंडट्रॅक जोडणे, कॅप्शन नोंदवणे, श्रेयनामावली तयार करणे अशा गोष्टींसाठी या अ‍ॅप्लिकेशनमध्ये सुविधा उपलब्ध आहे.

*वीव्हिडीओ*

अलीकडे अनेक अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर संगणकावर इन्स्टॉल न करता क्लाउड तंत्रज्ञानाच्या आधारे सव्‍‌र्हरवर साठवून तेथून हव्या त्या उपकरणावर वापरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. संगणकावरील हार्डडिस्कची जागा व्यापली जाऊ नये म्हणून अनेक जण आपले सॉफ्टवेअर ‘क्लाउड’वर इन्स्टॉल करतात. त्यामुळे जागा वाचतेच शिवाय हवी तेव्हा हव्या त्या संगणकावरून संबंधित सॉफ्टवेअर वापरता येते. अशाच सॉफ्टवेअरमध्ये ‘वीव्हिडीओ’चे नाव घेता येईल. फेसबुक, ट्विटर, यूटय़ूबसारख्या समाजमाध्यम संकेतस्थळांवर व्हिडीओ शेअर करण्यासाठी हे सॉफ्टवेअर अतिशय उपयुक्त आहे. या अ‍ॅप्लिकेशनसोबत पाच जीबीची क्लाउड स्पेसही मिळते. यावर व्हिडीओ एडिटिंगसाठी ‘स्पेशल इफेक्ट’ही पुरवण्यात आले आहेत.

*एव्हिडमक्स*

व्हिडीओ जोडणे, तोडणे, लोगो टाकणे, क्रॉप करणे, व्हिडीओ रोटेट करणे, रंगछटा बदलणे अशी अनेक कामे करणारा एव्हिडमक्स हा छोटा पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर आहे. यामध्ये व्हिडीओ एडिटिंगच्या सामान्य सुविधा उपलब्ध आहेतच; पण स्पेशल इफेक्टचे पर्यायही येथे उपलब्ध आहेत.

*व्हीएसडीसी फ्री व्हिडीओ एडिटर*

अवघ्या ३२७ केबी आकाराचा हा व्हिडीओ एडिटर छोटा असला तरी त्याची कार्यक्षमता दांडगी आहे. या सॉफ्टवेअरमध्ये एकाच वेळी अनेक व्हिडीओ ‘ओपन’ करता येतात. कट, कॉपी, पेस्ट, क्रॉप, ट्रिम अशा नेहमीच्या पर्यायासोबतच साउंडट्रॅक जोडणे, कॅप्शन टाकणे अशा अनेक गोष्टी या एडिटरच्या मदतीने करता येतात. मात्र, या व्हिडीओ एडिटरवर फक्त ‘एव्हीआय’ फाइल्सच एडिट करता येतात.

फोन अनरूट करणे

 
    ♻ *आपला फोन unroot कसा करावा*♻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     आपला फोन unroot कसा करावा याबाबत खालील प्रमाणे कृती करा.*

▶ *प्रथम play store मधून आपल्या फोन मधे ES file manager हे app डाउनलोड करून घ्या.*

▶ *हे app install करा व चालु करा.*

▶ *Find and press /system/bin/.*

▶ *Find and delete the file named su.*

 ▶ *You can press and hold on the file and then select "Delete" from the menu that appears.*

 *There may not be a su file here depending on how you rooted your device.*

▶ *Press /system/xbin/.*

▶ *Delete the su file here as well.*

▶ *Find and press /system/app/.*

▶ *Delete the Superuser.apk file.*

     *यानंतर आपला फोन reboot करा. फोन reboot केल्यानंतर वरील पद्धतीने आपला फोन unroot होवू शकतो.*

 *Play Store.वरुन root  checker app डाउनलोड करून आपण फोन unroot झाल्याची खात्री करू शकतो.*

              

ब्लॉग वेबसाईट बनवने

ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ? 
1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे. 
2 💻 प्रथमतः www.blogger.com वर जा. 
3 💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा. 
4 💻 यानंतर New Blog ला click करा. 
5 💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका. 
जसे e.g   ( salunkeguruji.blogspot.com]
6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 💻 create blog ला click करा .
8 💻 निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 💻 आता new post वर click करा .
10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 💻 तेथे आपली post तयार करा .
12 💻नंतर publish करा .
13 💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 💻 नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 💻  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
  

ब्लॉग तयार करने

ब्लॉग कसा तयार करावा ?

ब्लॉग तयार करायला शिका व तंत्रस्नेही शिक्षक बनण्यातील एक पायरी पूर्ण करा

ब्लॉगर.com वर ब्लॉग कसा तयार करावा?

१) आपल्या वेब ब्राऊजर सुरू करूनwww.blogger.com वर जा.

२) जर आपले गुगल अकांऊट नसेल (म्हणजे आपण gmail  वैगरे गुगलच्या सुविधा वापरत नसाल तर)  सर्वप्रथम ते तयार करा.

       अ) त्यासाठी खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे उजव्या कोपर्‍यातील SIGN UP बटणावर क्लिक करा.

       ब) खाली दर्शवल्याप्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित भरा.

३) जर तुमचे गुगल अकाऊंट असेल तर तुम्ही ते वापरून साइन इन करू शकतात. नवीन अकाऊंट तयार    करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकून साईन इन करा.

४) त्यानंतर खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे "Back to Blogger" या बटणावर क्लिक करा.

५) आता खाली दाखविल्याप्रमाणे तुम्हाला जर Google+ प्रोफाइल तयार करायची असल्यास "Create a Google+ profile" बटणावर क्लिक करा, अन्यथा केवळ "Create a Limited Blogger profile"  या बटणावर   क्लिक करून तुमचे Display name टाका आणि "Continue to Blogger" या बटणावर क्लिक करा.

६) आता नवीन पृष्ठ उघडेल. येथे उजव्या कोपर्‍यात "New Blog" या बटणावर क्लिक करा.

७)  त्यानंतर एक पॉप अप विंडो उघडेल. त्यात तुमच्या ब्लॉगचे नाव ( खालील आकृतीत 'Example Blog' ), वेब अ‍ॅड्रेस (खालील आकृतीत 'mr-exblog.blogspot.com' ) आणि तुम्हाला आवडणारी टेंम्प्लेट निवडा. टेंम्प्लेट म्हणजे तुमच्या ब्लॉगचा दर्शनीय अवतार. सविस्तर पुढे बघूच. आता 'Create Blog!' या बटणावर क्लिक करा. येथे भरलेली माहिती व निवडलेली टेंम्प्लेट तुम्ही नंतर केव्हाही बदलू शकता

८) आता तुमचा नवीन ब्लॉग तयार झालेला आहे. ब्लॉगवर लिहण्यासाठी खाली दाखविल्याप्रमाणे 'Start Posting' वर क्लिक करा.

९) आता तुम्ही ब्लॉगवर लिहू शकतात. त्यासाठी पोस्टला शीर्षक द्या आणि मजकूर लिहा. जर लिहणे पूर्ण झाले असेल तर Publish बटणावर क्लिक करा म्हणजे ती पोस्ट तुमच्या ब्लॉगवर दिसेल.  नाहीतर  पोस्ट अर्धवट असल्यास save बटणावर क्लिक करा म्हणजे ती पोस्ट तुमच्या ब्लॉगवर न दिसता जतन केली जाईल. नवीन पोस्टबद्दल सविस्तर नंतर बघूच.

१०) तुमच्या ब्लॉग संबधीत माहिती (पोस्ट्स, स्टॅट्स, सेटिंग्स, इ.) पाहण्यासाठी ब्लॉगच्या नावावर क्लिक करा. त्यानंतर खाली पृष्ठ उघडेल.

 ११) आता तुमचा ब्लॉग पाहण्यासाठी "View Blog" बटणावर क्लिक करा.

बस काम फत्ते!

एका गुगल अकाऊंटवर तुम्ही जास्तीत जास्त १०० ब्लॉग्ज बनवू शकता. प्रत्येक ब्लॉगसाठी वेगळे अकाऊंट तयार करण्याची आवश्यकता नाही.


Friday, January 13, 2017

ब्लॉग तयार करायला शिकत आहे

                                                


शालेय बाजार उपक्रम