_Best Photo Editing apps_

i) *PhotoDirector - Photo Editor:*

PhotoDirector हे अतिशय साधे आणि वापरण्यास सोपे फोटो इडिटर आहे. यात मोबाइलमधील इमेजेसला जलद गतीने आणि सोप्या पध्दतीने कोणताही इफेक्ट देता येतो. यात फोटो इडिटींग साठी अतिशय पावरफूल टूल आहेत जे फोटो मधील नको असलेले ऑब्जेक्ट किंवा व्यक्ती काढून टाकतात, सॅचूरेशन आणि टोन अॅडजेस्ट करतात, एका क्लिक ने फोटोसाठी अनेक प्रिसेट निवडता येतात.


ii) *Adobe Lightroom:*

एडॉब लाइटरूम या मोबाइल अॅप मध्ये तुम्ही कोणताही फोटो इडिट करू शकता आणि त्यांना इतर डिव्हाइस मध्ये अॅक्सेस करू शकता. यात 40 पेक्षा प्रिसेट आहेत जे एका क्लिकने इमजेसला अॅप्लाय करता येतात. तसेच यात कलर इफेक्ट, क्ल्ॅारिटी अॅडजस्ट, नॉइस रिडक्शन सारखे अनेक फिचर्स आहेत.


iii) *VSCO Cam:*

VSCO कॅम फोटो मध्ये बदल करण्यासाठी प्रिसेटची विस्तृत मालिका पुरवतो. याचा वापर करून कोणिही कोणत्याही फोटोला जबरदस्त आकर्षक बनवू शकतो.



_Best Selfie Apps:_

i) *YouCam Perfect - Selfie Cam:*

YouCam Perfect मध्ये तुम्ही कोणत्याही सेल्फीचे परिपूर्ण फोटो मध्ये रूपांतर करू शकता. YouCam Perfect हा तुमच्या चेह-याची नॅचरल ब्युटी वाढवतो. तसेच या अॅप मध्ये रिटचींग इफेक्ट, स्कीन टोन अॅडसमेंट, फिल्टर्स, चेह-यावरील सुरकत्या सहजपणे काढून टाकण्याची क्षमता यासारखे अनेक फिचर्स आहेत.

ii) *Candy Camera for Selfie:*

Candy Camera हे सुध्दा एक बेस्ट सेल्फी कॅमरा अॅप आहे. यात अनेक फिल्टर्स आहेत जे तुमच्या सेल्फीला आश्चर्यकारक इफेक्ट देतात. यात जिओ-टॅगींग, म्युट मोड, अनेक फिल्टर्स यासारखे अनेक फिचर्स आहेत.


iii) *Retrica:*

Retrica हे कोणत्याही फोटोला संस्मरणीय अनुभव परिवर्तन करतो. Retrica मधील लाइव्ह फिल्टर्स मध्ये फोटो घेण्याआधि तो कसा दिसेल हे बघता येते. या अॅपचा उपयोग मजेशिर सेल्फी, मौल्यवान कुटूंबासाबतचे क्षण, रोमांचक प्रवासाचे फोटो घेण्यासाठी करा.

_upadates may vary_
*Dont follow below link👇🏻*

https://drive.google.com/file/d/0ByAeWp8YuuOBVzBWaDA4b2VsR1E/view?usp=drivesdk

No comments:

Post a Comment